सुमेधाचा साखळी हायकू पुढे नेतांना अकिराने खो दिला आणि हायकू रचण्याचा प्रयत्न केला. या काव्यप्रकाराबद्दल सईच्या अनुदिनीचा बराच आधार झाला.
दाटल्या सयी
किरणांचा पहारा
भिरभिरला
साखळीचे नियम (सुमेधाच्या अनुदिनीवरून साभार) -
१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्त होणार्या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास माझ्या ब्लॉगवर मला कळवायचं. मला कळवायचा हेतू इतकाच की मी सगळ्या कड्या एकत्र करू शकीन.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.
Posted by Akira on सप्टेंबर 27, 2008 at 10:30 PM
Mastach!
Posted by Somesh on सप्टेंबर 30, 2008 at 6:19 PM
नाचनारा मोर,
का गं
बावरला ?
– हा हाईकू आहे का ?
हाईकूवर शिरिष पै यांचं काही लिखाणं वाचायला मिळाल होतं, तुमच्यामुळे पुन्हा आठवण झाली. “पाण्यावरल्या पाकळ्या” – शांता शेळके .. हेही असंच भन्नाट !
Posted by Shailesh S. Khandekar on ऑक्टोबर 1, 2008 at 1:15 AM
धन्यवाद अकिरा.
सोमेश,
आपले मनःपूर्वक आभार!
सईंच्या अनुदिनीवर हाईकूसंबंधी लेख आहे. त्याप्रमाणे हायकूमध्ये ५-७-५ असे स्वर यायला हवेत. त्यानुसार “नाचनारा मोर…” हा हाईकू नसावा असे वाटते. “पाण्यावरल्या पाकळ्या” हे मला नवीनच कळलं. आता शोधून वाचतोच ते,
Posted by साखळी हायकू….. माझी पाळी « माझी मी-अशी मी on ऑक्टोबर 1, 2008 at 11:25 AM
[...] | सुमेधाचा साखळी हायकू पुढे नेतांना शैलेशने खो दिला….. आणि अगदी पहिल्यांदाच मी [...]
Posted by जयश्री on ऑक्टोबर 1, 2008 at 11:30 AM
शैलेश…….मला दिलेल्या खो बद्दल धन्यवाद !!
इथे माझा हायकू बघ.
http://jayavi.wordpress.com/2008/10/01/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80/
Posted by Somesh on ऑक्टोबर 2, 2008 at 2:22 AM
http://thumb19.webshots.net/s/thumb1/1/53/18/109115318EQfBdv_th.jpg