हिंदीमध्ये आज्ञायनात रूची असल्यास हिंदवी प्रोग्रामिंग सिस्टम् या संचेतकाचा (सॉफ्टवेयरचा) वापर करता येईल. त्या आज्ञावलीच्या निर्मात्यांनी हिंदीसह बंगालीतही ही सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच, लवकरच मराठी, नेपाळी आणि आसामी भाषांसाठीही ही सोय उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मनोदय आहे.
देशी भाषांत आज्ञायन कसे व्हावे या प्रश्नाचे समाधान विविध पद्धतींनी केल्या जाऊ शकते. हिंदवीची शैली ही इंग्रजीतील सी आणि सी++, तसेच बेसिक इत्यादी आज्ञाभाषांचे देशी भाषांमध्ये शब्दशः भाषांतर अशा प्रकारची असल्याचे जाणवते. त्यांचा कृका (सोर्स कोड) न पाहिल्याने यावर अधिक भाष्य करू शकत नाही. त्यांचा कृका न पाहण्यामागे “निर्जंतुक गृहात आज्ञारचना” (क्नीन रूम इंप्लिमेंटेशन) करणे हा उद्देश्य आहे.
व्यक्तीशः मला वाटते की देशी भाषांमध्ये आज्ञाभाषा निर्माण करतांना त्यांत आपल्या भाषांच्या व्याकरणाचा आणि संस्कृतीचा प्रभाव असायला हवा. त्यामुळे हिंदवीच्या निर्मात्यांशी या तांत्रिक मुद्द्याबद्दल मी असहमत आहे. मात्र, देशी भाषांमध्ये संगणनाचा विकास करण्यासाठी अधिकस्य अधिकं फलम् या न्यायाने जितके प्रयत्न होतील तितके चांगलेच आहे. त्यामुळे, मी हिंदवीच्या निर्मात्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना सुयश चिंतीतो.
मागिल लेखात म्हटल्याप्रमाणे मराठीत, मराठी भाषेच्या दृष्टीने विचार करून बनवलेली आज्ञाभाषा विकसित करण्याचे कार्य मी सुरू ठेवले आहे. योग्य वेळेस त्याबाबत सविस्तर लिहिलच. तसेही जगात २५०० ते ८५१२ आज्ञाभाषा आहेत असे मानले जाते. त्यामुळे मला अभिप्रेत असलेली आज्ञाभाषा तयार होण्यास अजून दहा वर्षे लागली तरी चालेल, पण ती सुंदरच असायला हवी,
कृपया देशी भाषांतील आज्ञायन या संदर्भात आपल्याला अधिक माहिती मिळाल्यास ती मराठी विकिपिडीयावर चढवा म्हणजे सर्वांच्या सोयीसाठी ठिकाणी ही सगळी माहिती एकाच ठिकाणी, चटकन मिळेल. आपले शतशः आभार!
(शैलेश श. खांडेकर)

Posted by Omkar Deshmukh on ऑक्टोबर 7, 2008 at 6:37 AM
प्रिय ब्लोगर ,
तुझा मराठी ब्लोग वाचुन खुप छान वाटलं..
खुप उत्तम प्रतीच लिखण तु तुझ्या ब्लोग मध्ये केलं आहेस..
परंतू हे लिखाण जस्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणही महत्वाच आहे..
त्याबद्दल मी थोड माझ्या ब्लोग मध्ये लिहिल आहे..
त्याची तुला नक्कीच मदत होइल..
चल..पुन्हा भेटुच ब्लोग मधून..
मझ्या ब्लोग वर नक्की ये..
http://pune-marathi-blog.blogspot.com/