तो एक उंच तरू होता
विहरत गगनी, सावकाश
घेती झोके फांद्या तयाच्या
सह लडीवाळ वारा अवखळ
सरसर चढती कधीकाळी
काही व्रात्य, उत्साही मुले
आणिक सोबतीस असे ती
तदी बहु पक्ष्यांची किलबिल
एके दिवशी मग थबकला काळ
पाहोनी ज्यास फांदी एक तृप्त
म्हणे आता तुवा न्यावे मज सोबत
शीण हा आता आनंदाचा नको मज
शुष्क ती पुर्ण जाहलेली होतीच
मनी वाटे न तीज काही उणीव
वार्ता कुणाच्या का पुसाव्या कधी
असे म्हणता ती सरली आणिक नुरली
तीजसाठी खंत धरोनी
पथ थरथरला अंमळ
स्वगत तो बोलतो आहे
जगणे असावे असे सुंदर!
(शैलेश श. खांडेकर)

Posted by Nivedita on डिसेंबर 12, 2008 at 3:50 PM
shailesh,
khoopach sundar kavita lihili ahes! farch chaan!
-nivedita
Posted by Shailesh S. Khandekar on डिसेंबर 12, 2008 at 4:58 PM
धन्यवाद निवेदिता.
सकाळी एका रस्त्यावर नारळाच्या झाडाची फांदी पडलेली होती. त्यावरूनच ही कविता सुचली. तुला आवडली हे वाचून आनंद झाला.