नवीन मराठी शब्दकोष
मराठी भाषेत गणित, विज्ञान, तंत्रज्ञान आदी अनेक विषयांतील नवीन पारिभाषिक संज्ञा निर्माण करण्याचा प्रयत्नात सुचलेले प्रतिशब्द या पानावर संग्रही करून ठेवत आहे. तसेच मराठी भाषा पुढे नेण्याच्या प्रयत्नात सर्वांनी या चर्चांच्या संदर्भात सुचवलेले शब्दही जोडले आहेत. कृपया येथे अनवधानाने ऋणनिर्देश राहून गेला असल्यास मला विरोप पाठवा. हे शब्द मांडतांना अथवा तयार करतांना काही सूत्रे पाळलीत. ती म्हणजे -
१. नवीन शब्दांत मूळ इंग्रजी शब्दाच्या उच्चारापेक्षा शक्यतो कमी अक्षरे असावी.
२. जोडाक्षरांचा वापर सहसा टाळवा जेणेकरून क्लिष्टता कमी वाटेल.
३. शब्दशः भाषांतराऐवजी अर्थवाही शब्दांच्या निर्मितीवर भर द्यावा.
४. नवीन शब्दांची नाळ मराठी वळण आणि लयीस जोडलेली असावी.
५. शक्यतो शब्द काव्यात्म असावा.
आता हा प्रयत्न किती जमलाय ते तुम्हीच ठरवा. हे शब्द म्हणजेच प्रमाण असा काही माझा दावा नाही. हा केवळ एक प्रामाणिक प्रयत्न आहे. यातून मंथन होऊन जे अमृताचे थेंब निघतिल ते मराठीच्या सागरात पडावे हीच सदिच्छा.
येथे दिलेले सर्व शब्द मी नुकतेच शब्दभांडारात जोडले आहेत. सगळ्यांच्या सोयीसाठी एकच संदर्भ असावा म्हणून येथील शब्द काढून टाकत आहे. कृपया शब्दभांडारास भेट द्या आणि तो वाढविण्यास हातभार लावा!
स्नेहांकित,
शैलेश
१३ मे २००७, सकाळी १०.०८, पुणे.
जुने दुवे -
http://vidagdha.wordpress.com/2006/06/12/nms175/
http://vidagdha.wordpress.com/2006/07/18/nms33/
http://vidagdha.wordpress.com/2006/11/05/nms40/
जुन्या दुव्यांवरील प्रतिक्रिया येथे उद्धृत करीत आहे.
http://vidagdha.wordpress.com/2006/06/12/nms175/ साठी प्रतिक्रिया —
1. मिलिंद भांडारकर Says:
June 13th, 2006 at 5:17 PM
वा शैलेश,
तुमच्या प्रतिभेला बहर आलाय, यातच शब्दभांडाराचे खरे यश आहे.
- मिलिंद
2. vishvamohinee Says:
June 13th, 2006 at 8:03 PM
kaahee shabda visheSh aavaDale/paTale naaheet. kaahee chaa.ngale aahet.
bold saaThee jaaD aivajee ThaLak asaa shabda jaasta yogya aahe. constant laa sthiraaMk ase mhaNataat.
itar shabdaaMbaddal naMtar kadhee liheen.
vishvamohinee
3. Nandan Says:
June 14th, 2006 at 9:26 AM
Zoom Out - duraavalokan chaalel ka?
4. Shailesh S. Khandekar Says:
June 14th, 2006 at 1:40 PM
धन्यवाद मिलिंद, विश्वमोहिनी, नंदन!
आपल्या प्रतिक्रियांसाठी आभारी आहे.
Blod साठी “ठळक” जास्त चांगला वाटतो. Constant ला “स्थिरांक” हा शब्द प्रमाण मराठीत आहे हे माहित नव्हते. आपणही तोच वापरू या.
Zoom Out साठी “दूरावलोकन” छान वाटतोय. एकदम चपखल!
5. milind Says:
June 15th, 2006 at 12:11 PM
मजेशीर वाटतात हे मराठी शब्द. मी सुद्धा शब्दभांडारात भर टाकेन.
Interface ला काय म्हणावे बरं? मला एकदम योग्य शब्द सुचत नाहिये.
6. Shailesh S. Khandekar Says:
June 15th, 2006 at 1:46 PM
Interface साठी “संवादक” हा प्रतिशब्द भांडारात टाकलाय,
दोन वेगवेगळ्या वस्तु किंवा कल्पना यांच्यात संवाद साधतो तो संवादक.
7. Uday Mandrekar Says:
July 6th, 2006 at 5:04 PM
prayatna chaanglaa aahe. Mistake mhanje “chook”(Singular). Mistakes astil tar “chooka” barobar aahe.(Pural)
8. Shailesh S. Khandekar Says:
July 13th, 2006 at 10:54 AM
धन्यवाद उदय! ![]()
9. majhiduniya Says:
July 14th, 2006 at 9:18 AM
आपण शब्दभांडाराचे काम करत आहात. आज मला महाजालात फ़िरताना मायक्रोसॉफ्टची हा (http://www.bhashaindia.com/Community/CGW/Marathi.aspx) एक
दुवा सापडला आहे त्यावर अवश्य भेट द्यावी.
10. सुशांत Says:
July 19th, 2006 at 6:08 AM
Loopला फेरा म्ङणावे. फेऱ्यात गुंतणे, फेऱ्यातून सुटणे इ. संबंधित संज्ञाही लक्ष्यार्थाने वापरता येतील.
11. Shailesh S. Khandekar Says:
July 19th, 2006 at 11:19 AM
माझीदुनीया आणि सुशांत,
आपले मनःपूर्वक आभार.
मी मायक्रोसॉफ्टच्या दुव्यास भेट आधीच दिलेली आहे. परंतू, आपल्या सूचनेचे स्वागत आहे,
फेरा हा शब्द खरेच सुंदर आहे. लक्ष्यार्थही मस्तच. हा शब्द वापरायला हरकत नाही.
12. सुबोध Says:
September 18th, 2006 at 7:28 AM
काही शब्द :
Forum : सार्वत्रिका
Thumbnail: चित्रिका
modaretor : निरिक्षक
Gallery : संग्रह
database : संग्रह-तळ
Table : सारण्या
Opearating System साठी अगोदरच एक मराठी शब्द आहे : आज्ञावली.
मी मराठी शब्दासाठी एक संगणकिय शब्दकोश बनविला आहे. आपण तो माझ्या संकेतस्थळावर बघू शकता.
धन्यवाद,
सुबोध
13. Shailesh S. Khandekar Says:
September 18th, 2006 at 8:14 PM
सुबोध,
आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार! आपण सुचवलेले शब्द आवडले. आपल्या मतांचा पूर्ण आदर ठेवून, Database आणि Operating System साठी माझे मत देण्याआधी थोडा संदर्भ
देऊ इच्छितो.
Database साठी प्रतिशब्द बनवतांना Data या शब्दासाठी प्रतिशब्द आवश्यक आहे. मूळ लॅटिन शब्दाच्या व्युत्पत्तीचा (etymology) अभ्यास करून Data यासाठी विदा हा शब्द काढला.
त्यामुळे Database साठी विदाशय हा शब्द सुचवला. Operating System मध्ये System चा मूळ मराठीत विधी हा समानार्थी शब्द वापरल्या जातो. त्यामुळे त्याला संविधी हाच पर्याय
योग्य आहे. तसेच, आज्ञावली हा शब्द सुरूवातीपासूनच program ला समानार्थी म्हणून वापरल्या जातो.
आपल्या सर्वांच्या परस्पर सहकार्यानेच मराठी भाषा अधिक समृद्ध करता येईल! धन्यवाद, ![]()
14. सुबोध Says:
September 20th, 2006 at 7:57 AM
धन्यवाद ,
मला आपले म्हणने पटले. मी भाषातज्ञ नसल्यामुळे इतक्या खोलात गेलो नाही. आम्ही मित्रांनी एकमेकांशी चर्चा करून हे शब्द वापरले. आपण सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सुचीत बदल केला आहे.
तसेच आता मी एक स्क्रिप्ट बनवली आहे ज्याद्वारे तुम्ही इंग्रजीला पर्यायी मराठी शब्द शोधू शकता विदाशयामधून. ही php मध्ये आहे. सध्या ही सुविधा माझ्या मराठी संकेतावर
http://marathi.uni.cc/ आहे. तसेच तुम्ही मराठी शब्द टाकू शकता जेणेकरून हा शब्दकोश अजून वाढेल. सदस्य फ़क्त संकेत टाकू शकता. मला तुमचे या बाबतीत सहकार्य हवे आहे. जर
तुम्ही http://marathi.uni.cc/ वर सदस्य झालात तर बरे होईल. जेणेकरून तुम्ही नविन शब्द भरू शकाल.
ही स्क्रिप्ट लवकरच मी सार्वजनिकरित्या उपलब्ध करील एका पुर्ण संचासहित.
धन्यवाद.
सुबोध
15. Shailesh S. Khandekar Says:
September 20th, 2006 at 8:16 PM
सुबोध,
आपली काम करण्याची पद्धत आवडली. मी आपल्या संकेतस्थळाचा सदस्य झालो आहे,
http://vidagdha.wordpress.com/2006/07/18/nms33/ साठी प्रतिक्रिया —
1. मिलिंद भांडारकर Says:
July 18th, 2006 at 10:07 PM e
शैलेश,
kernel ला मी गाभा हा शब्द सुचवला आहे.
- मिलिंद
2. शैलेश श. खांडेकर Says:
July 19th, 2006 at 1:08 AM e
Kernel साठी गाभा हा शब्द छान आहे. आपण तोच वापरू या.
3. सुशांत Says:
July 19th, 2006 at 5:52 AM e
तुमचा उपक्रम आवडला. नवे मराठी शब्द घडवताना शक्यतो संस्कृत शब्द टाळून निखळ मराठी शब्द घडवता आले (आणि ते येतात) तर दुधात साखरच ! वानगी म्हणून Userला भोक्ता वा उपभोक्ता
ह्यापेक्षा वापरकरी म्हणावे
keyboard कळपाट
Search Engine हुडक्या (हा शब्द सलिल बडोदेकर ह्या माझ्या मित्राने सुचवला.)
4. Shailesh S. Khandekar Says:
July 19th, 2006 at 11:17 AM e
सुशांत,
आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार. हुडक्या हा शब्द खूपच सुंदर आहे. मला आवडला.
वापरकरी ह्या शब्दांत मूळ इंग्रजी “यूजर” पेक्षा अधिक अक्षरे आहेत. सहसा असे शब्द व्यवहारात मागे पडतात. त्यामुळे दोन किंवा तीन अक्षरी शब्द अधिक चांगला.
http://vidagdha.wordpress.com/2006/11/05/nms40/ साठी प्रतिक्रिया —
1. hemant patil Says:
November 5th, 2006 at 2:49 PM e
प्रिय शैलेश्भाइ,
प्रतीशब्दं एकदम चपखल बसणारे आहेत. फ़क्तं continuum ला संतती पेक्षा संतत हे जास्तं योग्य वाटतय. संततधार लागली असे आपण म्हणतो, संततीधार हे जरा कसेसेच वाटतं. शिवाय संतती
म्हणजे अपत्य हे येथे कसे काय justify होवू शकतं हे कळत नाही. हा, जर संस्क्रुत मध्ये असेल तर ठीक. पहा जमलं तर विचार करा.
mtrix ला पघा कसा निवडला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
2. आशुतोष Says:
November 8th, 2006 at 5:48 PM e
मला ह्यातले बरेचसे प्रतिशब्द पटलेले नाहीत उदा Boundedly deterministic सीमानिर्धारी. काही काही फार क्लिष्टही आहेत उदा Algorithmics कृतिक्रमाभ्यास. बघू मला जरा बरे
प्रतिशब्द मिळाले तर पाहीन.
3. Shailesh S. Khandekar Says:
February 23rd, 2007 at 6:28 AM e
हेमंतराव,
आपले मनःपूर्वक आभार! पघा हा शब्द फार पूर्वी खेड्यामध्ये ऐकला होता. Continuous ला संतत हा प्रतीशब्द प्रचलित असल्याने तो वापरू शकत नाही. संतती म्हणजे गूणसूत्र (Genetic)
Continuum या अर्थाने तो शब्द सुचवला होता. त्याला सातत्य असेही म्हणू शकतो. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. या विषयावर चर्चा होऊन अधिकाधिक गणिती शब्द मराठीत येणे गरजेचे आहे.
आशुतोष,
आपले मनःपूर्वक आभार! मूळ शब्दांचे भावार्थ लक्षात घेऊन त्यांना शक्य तितके योग्य प्रतिशब्द सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच, या शब्दांना अधिक चांगले प्रतिशब्द मिळाले तर फारच छान होईल.
परस्पर सहकार्यानेच आपण मराठीस पुढे नेऊ शकू.
इतर संकेतस्थळांवरील प्रतिक्रियांचे दुवे -
गणिती संज्ञांसाठी प्रतिशब्द - उपक्रम - http://mr.upakram.org/node/22#comments
नमस्कार शैलेश
तुमची नवीन शब्द शोधण्याची पद्धत फारच छान आहे. लगे रहो. तुमचे काही शब्द Thuanr चे भाषांतर करतांना साभार “उचलतो” आहे.
Pipe हा शब्द अडचणीत टाकतो आहे. दोन Processes जोडणारा म्हणून त्याला दुवा किंवा सांधा हा शब्द कसा वाटतो?
प्रिय उदयराज,
आपले मनःपूर्वक आभार! हे शब्द आपल्या सगळ्यांच्या वापरासाठीच आहेत,
Pipe चा शब्दशः विचार करता ‘नळी’ किंवा ‘नलिका’ हा शब्द पुढे येतो. दोन प्रक्रियांना (processes) जोडणारा दुवा या अर्थाने विचार करता प्रकियानलिका -> प्रक्रियानळी -> “प्रनळी” हा शब्द सुचतोय. हा शब्द आपल्याला आवडल्यास अवश्य वापरा, 
Electronics विद्युतिकी
इलेक्ट्रॉनिक्सला विद्युतिकी हा पर्याय योग्य वाटत नाही. विद्युत ही वेगळीच असते. विश्वनाथ खैरे ह्यांनी आपल्या युगाणी ह्या कुमारकवितांच्या संग्रहात केलेली मांडणी गंमतीची आहे. अणू हा कण असतो. पण त्यातही आणखी काही कणुले असतात. ते तीन तऱ्हेचे असतात. धनुले, उणुले आणि बिनुले. इलेक्ट्रॉनिक्सचा संबंध ह्यातल्या उणुल्याशी आहे. त्यावरून उणुल्की असा शब्द घडवणं शक्य आहे. पण त्यासाठी सबंध संदर्भ कळावा लागेल. थोडा अधिक शोध घ्यावा लागेल.
सुशांत,
आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार! श्री. नरेंद्र गोळे यांनी Electronics साठी वीजकविद्या असा पर्याय सुचवला होता. http://thebhandarkars.com/shabdabhandar/index.php?title=Electronics
उणुल्की हा शब्द फारच सुंदर आहे. आपण हाच शब्द इलेक्ट्रॉनिक्सला मराठी प्रतिशब्द म्हणून वापरू या! असेच अजून सुंदर-सुंदर शब्द सुचवा की!
‘@’ ह्या वेटोळ्याच्या खुणेला मराठीत काय म्हणावं हा प्रश्न बरेच दिवस छळत होता. प्रा. अनघा मांडवकर ह्यांनी ह्या खुणेला ‘मुक्काम’ म्हणावं असं सुचवलं आहे. तेव्हा आता आपला इ-डाकेचा पत्ता ‘क्ष मुक्काम अमुक टिंब कॉम’ असा सांगता येईल.
मुक्काम हा मस्त शब्द आहे.
‘@’ ya shabdala ‘Mukkam’ gk ekmev sunder shabda disun yeto. Asa yuogya shabda suchavlya bddal dhanyavad
farach chan…satat ingrajit bolalele shabda marathit bolayala far changale vatel.
tasech…Marathi bhavagitancha aswad khalil site var gheta yeil.
http://www.bhavagandha.com/